एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेल्यांमध्ये सुरू झाली वर्चस्वाची लढाई अन् घडला थरार...

संतोष ताकपिरे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शुक्रवारी रात्री त्यावरूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन शिवीगाळ झाली. ‘तुला चाकूच मारतो' असे सांगून धीरज पानटपरीजवळून घरी गेला. घरातून एक मोठा धारदार चाकू घेऊन आला. पंकज सिडाम अन्य काही युवकांसोबत चर्चा करीत उभा होता. त्याच्या नकळत मागून धारदार चाकूने सपासप तीन वार केले. 

अमरावती : एकेकाळी गुन्हेगारी जगतात एकमेकांचे सहकारी असलेल्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. त्यातून एकाने जुन्या साथीदाराचा खून केला. शुक्रवारी (ता. ३१) रात्री शोभानगरात ही घटना घडली. 

पंकज गोकुल सिडाम (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. धीरज उर्फ कावा विश्वास ठाकरे (वय २५, रा. शोभानगर) विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला काही तासांतच पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज गोकुल सिडाम (वय ३२) व धीरज उर्फ कावा विश्वास ठाकरे (वय २५, रा. शोभानगर) हे दोघेही काल रात्री जेवण करून शोभानगर ते विलासनगर मार्गावरील एका पानटपरीजवळ चर्चा करीत बसले होते. धीरज हा पंकजचा काही दिवसांपूर्वी साथीदार म्हणून काम करीत होता. परंतु, काही दिवसांपासून पंकजचे वर्चस्व धीरजच्या मनात सलत होते. 

सविस्तर वाचा - आई-वडिलांची मेहनत सफल झाली, कौतुकही झाले, आनंदही झाला; मात्र, पुढे काय? वाचा संघर्ष…

शुक्रवारी रात्री त्यावरूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन शिवीगाळ झाली. ‘तुला चाकूच मारतो' असे सांगून धीरज पानटपरीजवळून घरी गेला. घरातून एक मोठा धारदार चाकू घेऊन आला. पंकज सिडाम अन्य काही युवकांसोबत चर्चा करीत उभा होता. त्याच्या नकळत मागून धारदार चाकूने सपासप तीन वार केले. 

गंभीर जखमी पंकजला सोडून धीरज फरार झाला. जखमीस काही लोकांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पंकजचा मृत्यू झाला. त्यानंतर गाडगेनगर ठाण्यातील डीबी स्कॉडने मारेकरी धीरज उर्फ कावा यास अटक केली.

विशेष बातमी  -  “सानिका तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे” थेट विधान भवनातून आला फोन आणि तिला बसला आश्चर्याचा धक्का..

धीरजला केले होते तडीपार 
हल्लेखोर धीरजविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला मध्यंतरी तडीपार केले होते. मृत सिडामविरुद्धही मारामारी, प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. 
- मनीष ठाकरे, 
पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

 संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati murder over domination dispute