नेहरू मैदनावरूनच झालाय अनेक चळवळींचा श्रीगणेशा, पण आज आले डम्पिंग यार्डचे स्वरुप

राजू तंतरपाळे
Thursday, 19 November 2020

राजकमल चौकातील नेहरू मैदान हे अमरावतीकरांचे हृदय समजले जाते. अनेक राजकीय सभांचा धडाका याच नेहरू मैदानाने पाहिला आहे. येथूनच अनेकदा सत्ता संघर्षाची तुतारी फुंकली गेली. मात्र, आज राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी या मैदानाची दूरवस्था झालेली आहे.

अमरावती : शहरातील नेहरू मैदानातून राजकीय नेत्यांनी नेतृत्व बदल घडवून आणले. अनेक चळवळींचा श्रीगणेशा येथूनच झाला. हे ऐतिहासिक मैदान असून याला शहराचे हृदयही मानले जाते. मात्र, आज याच नेहरू मैदानावर कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहे. विशेष म्हणजे लाल शाळेत विद्यार्थी ज्ञानार्जन करतात त्याच शाळेच्या पायथ्याशी शहरातील कुडा-कचरा टाकला जातो.

हेही वाचा - फक्त दोन बोटांनी उचलता येणारी हलकी सायकल, पण किंमतीला...

राजकमल चौकातील नेहरू मैदान हे अमरावतीकरांचे हृदय समजले जाते. अनेक राजकीय सभांचा धडाका याच नेहरू मैदानाने पाहिला आहे. येथूनच अनेकदा सत्ता संघर्षाची तुतारी फुंकली गेली. मात्र, आज राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी या मैदानाची दूरवस्था झालेली आहे. शहरातील विविध भागातून गोळा करण्यात आलेला ओला व सुखा कचरा कंत्राटदारांची माणसे याच मैदानात रिकामी करीत आहेत. वास्तविक नियमानुसार कंत्राटदाराने प्रभागातील कचऱ्याची विल्हेवाट शहराच्या बाहेर लावण्याचा नियम आहे. मात्र, या नियमांना हरताळ फासून खुलेआमपणे नेहरू मैदानात कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. एकाही लोकप्रतिनिधीने किंवा जबाबदार अधिकाऱ्याने याबाबत कुणाकडे विचारणा केलेली नाही. यावरून बेजबाबदारपणा सिद्ध होतो. विशेष म्हणजे बाहेरचा कचरा याठिकाणी आणून टाकला जातो. त्यामुळे या मैदानावर कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत.    

हेही वाचा -  आयुर्वेदिक औषधांना सुवर्णकाळ; प्रतिकारशक्ती...

सायंस्कोरला पर्याय -
जिल्हापरिषदेंतर्गत सायंस्कोर मैदानावर काही दिवसांपूर्वी स्वच्छता कंत्राटदारांकडून कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या करण्यात येत होत्या. मात्र, स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी याविरोधात आवाज बुलंद केल्याने तसेच जिल्हापरिषदेने कठोर भूमिका घेतल्याने सायंस्कोरवर कचरा टाकणे बंद झाले. मात्र, आता त्यासाठी नेहरू मैदानाचा पर्याय शोधून काढण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati nehru ground look like dumping yard

Tags
टॉपिकस
Topic Tags: