Amravati Baby Trafficking Case
esakal
अमरावती : शहरातील महिला डॉक्टरांच्या रुग्णालयातून केल्या जात असलेल्या कथित बालक विक्री व तस्करीप्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुख व माजी नगरसेविका वर्षा भोयर यांनी सोमवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत केली. डॉ. वैशाली भोजने यांच्या रुग्णालयातून हा गैरप्रकार बऱ्याच वर्षांपासून सुरू असून, आतापर्यंत त्यांनी व त्यांच्यासोबत असलेल्या टोळीने किमान शंभरपेक्षा अधिक नवजात बालकांची विक्री केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.