
चोरीच्या चोवीस दुचाकी त्यांनी जप्त केल्या. त्यापैकी ग्रामिण भागाच्या खोलापुर येथील एकास पोलिसांनी अटक केली. अन्य दोघांची चौकशी बुधवारी (ता. 25) सायंकाळपर्यंत सुरूच होती. जप्त केलेल्या दुचाकींपैकी बहुतांश दुचाकी या आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरलेल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
अमरावती ः शहरात व ग्रामिण भागात दुचाकीचोरीच्या घटनांनी लॉकडाऊन काळापासून जोर धरला होता. सतत वाढत असलेल्या घटनांमुळे शहर व ग्रामिण पोलिसांवरील दबाव वाढत असताना, ग्रामिण गुन्हेशाखेच्या पोलिसांना यश आले.
चोरीच्या चोवीस दुचाकी त्यांनी जप्त केल्या. त्यापैकी ग्रामिण भागाच्या खोलापुर येथील एकास पोलिसांनी अटक केली. अन्य दोघांची चौकशी बुधवारी (ता. 25) सायंकाळपर्यंत सुरूच होती. जप्त केलेल्या दुचाकींपैकी बहुतांश दुचाकी या आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरलेल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
गुन्हेशाखेचे एक पथक अटकेतील युवकाला सोबत घेऊन अकोला जिल्ह्यात चौकशीसाठी गेले. चोरीच्या दुचाकी पाच ते दहा हजार रुपयांमध्ये दुसऱ्याला विकल्या होत्या. ज्याला अटक केली, त्याचे व त्याच्या साथीदारांचे नाव उघड करण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिला. लॉकडाउननंतर मोठ्या प्रमाणावर स्थानिक गुन्हेशाखेने चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. त्याला अन्य दोघे दुचाकी चोरून आणून देत होते. परंतु बुधवारपर्यंत दुचाकी चोरणाऱ्यांपर्यंत पोहचण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरूच होते.
गाडगेनगर, फ्रेजरपुरा, शहर कोतवाली, राजापेठ व बडनेरा ठाण्याच्या हद्दीत लॉकडाउन सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीस गेल्याचे गुन्हे दाखल आहे. ज्यांच्या दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरीस गेल्या होत्या त्यापैकी बरीच मंडळी स्थानिक गुन्हेशाखेच्या कार्यालयात पोहचले होते.
नंबर प्लेट, सुट्या भागाची अदलाबदल
स्थानिक गुन्हेशाखेने जप्त केलेल्या बहुतांश दुचाकींच्या नंबरप्लेटची अदलाबदल केली होती. तर, काहींचे सुटेभाग बदलले. या दुचाकी पाच ते दहा हजार रुपयांमध्ये बेभाव विकल्या होत्या.
गुन्हेशाखेचे पथक एलसीबीत
जप्त केलेल्या दुचाकींपैकी बऱ्याच शहरातून चोरीस गेलेल्या असल्याने एलसीबीच्या कारवाईनंतर शहर गुन्हेशाखेचे पोलिस बऱ्याच वेळेपर्यंत एलसीबीच्या कार्यालयात तळ ठोकून होते.
संपादन - अथर्व महांकाळ