esakal | अमरावती : पाच दिवसांच्या पावसाने 477 गावे बाधित, तिघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

गावे पाण्याखाली

अमरावती : पाच दिवसांच्या पावसाने 477 गावे बाधित, तिघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सप्टेंबर महिन्यातील पावसाने जिल्ह्यातील दहा हजार हेक्टर शेतजमीन खरडून गेली असून 33 टक्क्यांवर पिकांचे नुकसान झाले आहे. 477 गावे बाधित झाली असून तीन व्यक्तींसह लहान मोठ्या 32 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सर्वत्रच धो धो पाऊस कोसळला. जवळपास 180 मिमी पाऊस 6 ते 11 सप्टेंबरदरम्यान कोसळला. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाने शेतजमिनीचे भरपूर नुकसान झाले आहे. 6 ते 11 सप्टेंबर या कालावधीत धो धो पाऊस कोसळला. पाच दिवसांत तब्बल 180 मिमी पाऊस जिल्ह्यात झाला.

हेही वाचा: टेंभूच्या अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टीमेटम

या पावसाने 477 गावे बाधित झाली असून दहा हजार हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल नोंदविण्यात आला आहे. नांदगावखंडेश्वर तालुक्यातील सर्वाधिक 112 गावांसह धामणगावरेल्वेतील 96, भातकुलीतील 81, चांदूररेल्वेतील 45, तिवसा येथील 33, वरुड व दर्यापूरमधील प्रत्येकी 15, मोर्शी 12, अमरावती 13, अंजनगावसुर्जी 30, चिखलदरा नऊ, अचलपूर तीन, चांदूरबाजार दोन व धारणीतील 1 गाव बाधित झाले आहे.

अमरावती तालुक्यातील एक व अंजनगावसुर्जी तालुका येथील दोन, अशा तीन व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चार मोठ्या व 28 लहान पशूंचाही मृत्यू या पावसाने झाला आहे. दहा घरे पूर्णतः तर 1328 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.

33 टक्क्यांपेक्षा अधिक शेतजमिनीचे नुकसान झालेल्या तालुक्यांमध्ये भातकुली 1020, धामणगावरेल्वे 748, नांदगाव खंडेश्वर 5828, मोर्शी 55, वरुड 78, दर्यापूर 1515, तर अंजनगावसुर्जीतील 715 हेक्टरचा समावेश आहे.

शासनाने सर्वेक्षण केलेल्या नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षात यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील पातळीवर नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. तलाठ्यांना गावागावांत व शेतावर जाऊन पंचनामे करण्यास बजावण्यात आले आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

loading image
go to top