

Amravati
esakal
अमरावती: नवीन शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया, विविध शासकीय योजनांसाठी लागणारी प्रमाणपत्रे आणि शेतीसंबंधित कागदपत्रांची वाढती मागणी, यामुळे जिल्ह्यातील सेतू केंद्रे व तलाठी कार्यालयांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र सर्व्हर वारंवार बंद पडणे, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमेसाठी तलाठ्यांच्या ड्युट्या लागल्याने कामांचा वेग मंदावला असून विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी फरफट होत आहे.