esakal | आरोग्य विभागावर बदल्या गुंडाळण्याची नामुष्की | Amravati
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य विभाग

Amravati : आरोग्य विभागावर बदल्या गुंडाळण्याची नामुष्की

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : प्राथमिक उपकेंद्रस्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सहा ते सात जणांच्या बदल्या गुंडाळण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली. पंचायतराज समितीसमोर प्रकरण गेल्यास ते अंगावर शेकण्याची चिन्हे दिसल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बदल्यांचे आदेश रद्द केलेत. याप्रकाराची आता जिल्हापरिषदेत खमंग चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात 340 आरोग्य उपकेंद्रांतर्गत जवळपास 240 समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी ही पदे रिक्त आहेत. नियमानुसार नियुक्ती दिलेल्या उपकेंद्राशिवाय त्यांची कुठेही पदस्थापना किंवा बदली केली जाऊ शकत नाही.

हेही वाचा: Lakhimpur: देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून - संजय राऊत

मात्र आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी सरळसरळ सहा ते सात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना आधी पदस्थापना दिली व त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली.

त्यातही मेळघाटमधून गैरआदिवासी भागात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना बदली धोरण लागू नसल्याने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या रद्द करण्यात येऊन त्यांना पूर्वीच्या ठिकाणी पदस्थापना देण्याचे स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. त्यामुळे या बदलीप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता तसेच देवाण-घेवाण झाल्याची कुजबूज जिल्हापरिषदेत आहे.समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात येत असून त्यांना मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती

loading image
go to top