Amravati : सोनोरा येथील शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amravati sucide news

Amravati : सोनोरा येथील शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

चांदूर रेल्वे : तालुक्यातील सोनोरा बु. येथील एका शेतकऱ्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा ताण यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.

हेही वाचा: Amravati : युवा शेतकऱ्याची आत्महत्या

अश्विन दुर्योधन गणवीर (४०) यांनी चांदूररेल्वेजवळील स्मशानभूमीच्या काही अंतरावरील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली. अश्विन गणवीर यांच्याकडे दोन एकर शेती असून, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे कर्ज होते.

हेही वाचा: Amravati: चालत्या बसनी घेतला पेट,35प्रवासी थोडक्यात बचावले

यावर्षी अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक ओल्या दुष्काळामुळे नष्ट झाले. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या विचाराने अश्विन गणवीर हे नैराश्येत गेले. घरची परिस्थिती हालाखीची आहे.अश्विन गणवीर यांच्यापश्चात दोन दिव्यांग मुले, पत्नी, आई व वडील असा मोठा परिवार आहे