अमरावती : पैशासाठी रॉडनी हल्ला करून खून

पैशाच्या कारणावरून झोपेत असलेल्या युवकावर रॉडनी हल्ला करून खून केला. राजेश भारत गिरी असे मृताचे नाव आहे.
murderer attack for money
murderer attack for moneySakal
Summary

पैशाच्या कारणावरून झोपेत असलेल्या युवकावर रॉडनी हल्ला करून खून केला. राजेश भारत गिरी असे मृताचे नाव आहे.

अमरावती - पैशाच्या कारणावरून झोपेत असलेल्या युवकावर रॉडनी हल्ला करून खून केला. राजेश भारत गिरी (वय ४०, रा. फैलढाणा), असे मृताचे नाव आहे. धारणी तालुक्यातील हरिसाल फैलढाणा गावात बुधवारी रात्री ही घटना घडली. धारणी पोलिसांनी आरोपी करण मोहन पंजाबी (वय २७, रा. हरिसाल फैलढाणा) याला गुरुवारी (ता. ९) अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, करण पंजाबीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. करण याचा चार वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह झाला आहे. राजेश भारत गिरी हे करण याच्या पत्नीचे काका आहेत. राजेश गिरी हे गरीब असून बकऱ्या चारण्याचे काम करतात.

हलाखीच्या परिस्थितीमुळे करणची पत्नी तिचे काका राजेश यांना आर्थिक मदत करीत होती. तिने काहीवेळा काका राजेश यांना पैसे दिले होते. ते दिलेले पैसे परत मागण्यासाठी करण पंजाबी याने आपल्या पत्नीच्या मागे तगादा लावला होता. बुधवारी रात्री करण पंजाबी याने राजेश गिरी यांच्यावर लोखंडी रॉडनी हल्ला केला. गंभीर जखमी राजेश यांना उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्यान राजेश यांचा जागीच मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com