Chandrashekhar Bawankule : अनिल देशमुखांसारखा भ्रष्टाचार यांना करता येणार नाही; म्हणूनच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Bawankule

अनिल देशमुखांसारखा भ्रष्टाचार यांना करता येणार नाही; म्हणूनच...

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैलगाडी आणि सायकल मोर्चा काढला होता. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावे, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे केंद्र सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली. आता राज्य सरकारने कर कमी करून जनतेला दिलासा देण्याची वेळ आली तर नाना पटोलेंसह महाविकास आघाडी सरकारचे नेते का मागे हटले, असा सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्यावरून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शहरातील व्हेरायटी चौकात शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. सरकारने व्हॅट कमी केले तर दररोज ४०० ते ५०० कोटी रुपये राज्य सरकारचे नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्य सरकार कर कमी करण्यास मागेपुढे पाहात आहे. परंतु, याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

हेही वाचा: बाहेरून फिरून येतो अस म्हणत घराबाहेर पडला अन् झाला खून

रोजच्या ५०० कोटींवरील १० टक्के कमीशन म्हणजे ५० कोटी रुपये हे या लोकांना मिळणार नाहीत. म्हणून पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्यात येत नाही आहे. अनिल देशमुखांसारखा भ्रष्टाचार या लोकांना करता येणार नाही. म्हणून हे सरकार जनतेचा खिसा कापत असल्याचा घणाघाती आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

loading image
go to top