अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार अ‌ॅड. सरनाईक आघाडीवर

amravati teacher constituency election result update
amravati teacher constituency election result update
Updated on

अमरावती :  अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. यामध्ये पहिल्या फेरीमध्ये आतापर्यंत १४००० मतांच्या झालेल्या मोजणीमध्ये अपक्ष उमेदवार अ‌ॅड. किरण सरनाईक यांनी ३१४९ मते घेऊन आघाडी घेतली.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गेल्या १ डिसेंबरला मतदान झाले. त्यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती. आज सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पहिली फेरी पूर्ण झाली असून यामध्ये अपक्ष उमेदवार अ‌ॅड. किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे असून त्यांना २२९९ मते मिळाली आहेत. शेखर भोयर यांना २०१० मते मिळाली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, गेल्या १ डिसेंबरला या निवडणुकीत 86.73 टक्के मतदान झाले आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढला असून हे वाढलेले मते कोणाच्या पारड्यात पडतात हे पूर्ण कल हाती आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com