Amravati teachers constituency election 23rd elimination round over
Amravati teachers constituency election 23rd elimination round over

अमरावतीत भाजपसह तब्बल २३ उमेदवार बाद: २३व्या बाद फेरीनंतरही अपक्ष सरनाईक यांची आघाडी कायम

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात विजयासाठी चुरस सुरू आहे.२३ बाद फेऱ्या आटोपल्या तेव्हा अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी आघाडी कायम ठेवली,मात्र विजयासाठी अजूनही त्यांना ६०७४ मतांची आवश्यकता आहे.महाविकास आघाडीचे प्रा.श्रीकांत देशपांडे यांच्यावर त्यांनी १८१९ मतांची आघाडी घेतली आहे.

पहिल्या पसंतीच्या दोन फेरीमध्ये घेतलेली आघाडी सरनाईक यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्येही काय‘ ठेवली. एकूण २७ उमेदवारांपैकी २३ उमेदवार बाद झाले असून २३ व्या बाद फेरीनंतर किरण सरनाईक यांची आघाडी मोडून काढण्यात प्रा.श्रीकांत देशपांडे यांना यश मीळू शकलेले नाही. अपक्ष उमेदवार शेखर भोयर याना ६४५४ मते मिळाली. 

या शर्यतीतील अन्य अपक्ष उमेदवार संगीता शिंदे यांचे आव्हान २३ व्या फेरीत संपुष्टात आले.त्या बाद झाल्या असून त्यापूर्वी भाजपचे डॉ. नितीन धांडे व अविनाश बोर्डे बाद झालेत.आता अखेरची बाद फेरी लवकरच सुरू होणार असून त्यामध्ये शेखर भोयर यांच्या दुसऱ्या पसंतीची ‘ते मोजली जाणार आहेत.या फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण होण्याची शक्यता अंधूक आहे.त्यामुळे सर्वाधिक ‘मते मीळवणाऱ्या उमेदवाराच्या विजयाची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान किरण सरनाईक यांची आघाडीकडील वाटचाल बघता त्यांचे वाशिम येथील समर्थक व कार्यकर्त्यांनीनी अमरावतीत धाव घेतली आहे. मतमोजणी केंद्रावर कालपासून उपस्थित असलेल्या सरनाईक यांनी मात्र अद्याप कुणाशीही बोलण्यास नकार दिला असून अंतिम निकालानंतर संवाद साधू असे त्यांचे म्हणणे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com