
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील 35 हजार 622 पैकी 30 हजार 918 शिक्षक मतदारांनी मतदानाच हक्क बजावला. मतदानाची सरासरी 86.73 इतकी राहली. गतवेळी 66 टक्के मतदान झाले होते.
अमरावती ः दुसऱ्या पंसतीच्या पंचिवसाव्या अखेरच्या बाद फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी 3242 मतांची आघाडी मिळवत विजय निश्चित केला. त्यांच्या विजयाची औपचारीक घोषणा बाकी असली तरी सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार म्हणून त्यांची या निवडणुकीत सरशी झाली आहे. त्यांना एकूण 12 हजार 433 मते मिळालीत. कोटा पुर्ण करण्यासाठी 2483 मते कमीच आहेत.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील 35 हजार 622 पैकी 30 हजार 918 शिक्षक मतदारांनी मतदानाच हक्क बजावला. मतदानाची सरासरी 86.73 इतकी राहली. गतवेळी 66 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतांचा टक्का तब्बल 20 टक्क्याने वाढला.त्यामुळे वाढलेला मतांचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडेल याचे अदमास लावण्यात येत होते.
जाणून घ्या - नागपुर पदवीधर निवडणूक: पराभव नक्की कोणाचा? भाजपचा की संदीप जोशींचा?
गुरूवारी (ता.3) सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात झाली.पहील्या पसंतीच्या दोन फेऱ्या झाल्यानंतर विजयासाठी 14 हजार 916 मतांचा कोटा निर्धारित झाला. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी मिळवणाऱ्या किरण सरनाईक यांनी त्यांची मतांची आघाडी दुसऱ्या पसंतीच्या फेरीतही कायम ठेवली.बाद फेरीतील अखेरच्या फेरीत किरण सरनाईक यांनी दुसऱ्या पंसतीची 2481 तर महाविकास आघाडीच्या प्रा. श्रीकांत देशपांडे यांना 1398 मते मिळालीत.
पहील्या पसंतीच्या फेरीपासूनच सरनाईक यांनी आघाडी घेतली होती, ती त्यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्येही कायम ठेवली. एकूण 27 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 25 उमेदवार बाद झालेत. दुसऱ्या क्रमांकासाठी श्रीकांत देशपांडे व शेखर भोयर यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र 25 व्या फेरीत भोयर बाद झालेत.
मिळालेली एकूण मते
किरण सरनाईक (अपक्ष) ः 12,433
श्रीकांत देशपांडे ( महाविकास आघाडी) ः 9191
अधिक वाचा - ताडोबाला पर्यटनासाठी जाताना सुटले गाडीवरील नियंत्रण अन् घडला मृत्यूचा थरार
शिक्षकांच्या समस्या मांडणार
विधान परिषदेत शिक्षकांच्या समस्या मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. शिक्षक मतदार व समर्थकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभारी असून या मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया विजयी उमेदवार किरण सरनाईक यांनी दिली.
संपादन - अथर्व महांकाळ