Amravati Teachers Constituency Result
esakal
अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार अॅड. किरण सरनाईक यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. पसंतीक्रमांक दोनच्या मतमोजणीत आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या निवडणुकीत काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे गेल्या सव्वाचार दशकांपासून शिक्षक संघटनांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात राजकीय पक्षाला यश मिळाले आहे.