Amravati Crime News
esakal
रविवारी बडनेरा रेल्वेस्थानकाजवळ कुणाल तेलमोरे नावाच्या १७ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. एका लॉजच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटकही केली होती. त्यांच्या चौकशीतून आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीतून हा खून झाला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.