कोरोनाच्या विस्फोटानंतर अमरावती दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर; चिंताजनक स्थिती

Amravati on the threshold of the second wave after the explosion of the corona
Amravati on the threshold of the second wave after the explosion of the corona
Updated on

अमरावती : वाढती रुग्णसंख्या पाहता अमरावती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याची भीती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरुवातीपासून कोरोना रुग्णांवर उपचार करणारे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी भूषण यांनी व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबतसुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केली.

मागील १० ते १२ दिवसांपासून अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. १२ दिवसांमध्ये जवळपास २,४०० रुग्ण आढळून आले असून, सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. त्याअनुषंगाने डॉ. रवी भूषण यांनी नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाची ही स्थिती भयानक रूप धारण करू शकते, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

मागील काही दिवसांत लग्नसमारंभ तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दी वाढली असून मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंगचा अभाव यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. सतर्कता बाळगणे अतिशय गरजेचे आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

अनेकदा पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात जाताना एकटेच जात नाहीत तसेच प्रवासी असलेल्या ऑटोने रुग्णालय गाठतात. त्यामुळे इतरांना संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे अशा रुग्णांनी एकट्यानेच किंवा अगदीच गरज असेल तर एक नातेवाईक सोबत आणावा. सतर्कता न बाळगल्यास भयानक स्थिती निर्माण होऊ शकेल, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.

सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी. मनामध्ये कुठलाही भीती न बाळगता सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. रवी भूषण यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com