अमरावती विद्यापीठाचे नोंदणी, परीक्षा अर्ज आता ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात प्रथम वर्षात विद्यार्थी प्रवेशित होणार असल्यास त्याला प्रवेश अर्ज हा ऑनलाइन भरावा लागणार आहे. तर हिवाळी सत्रापासून परीक्षांचे अर्जही ऑनलाइन भरावे लागणार आहेत. यामुळे विद्यापीठाकडे आता रद्दीचा भरणा कमी होऊन सर्व माहिती अपडेट राहणार आहे. तर विद्यार्थ्यांना आपला नोंदणी क्रमांक लक्षात ठेवायची गरज राहणार नाही.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात प्रथम वर्षात विद्यार्थी प्रवेशित होणार असल्यास त्याला प्रवेश अर्ज हा ऑनलाइन भरावा लागणार आहे. तर हिवाळी सत्रापासून परीक्षांचे अर्जही ऑनलाइन भरावे लागणार आहेत. यामुळे विद्यापीठाकडे आता रद्दीचा भरणा कमी होऊन सर्व माहिती अपडेट राहणार आहे. तर विद्यार्थ्यांना आपला नोंदणी क्रमांक लक्षात ठेवायची गरज राहणार नाही.
बारावीचे निकाल लागल्यानंतर महाविद्यालयीन सत्र सुरू होताच प्रथम वर्षाला विद्यार्थी प्रवेशित होतात. विद्यापीठांतर्गत उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थी प्रवेशित झाला की त्याला विद्यापीठाकडून एन्‍रॉलमेंट क्रमांक दिल्या जातो. हा क्रमांक त्याचे संपूर्ण शिक्षण होईस्तोवर कायम राहतो. यावरून विद्यापीठात विद्यार्थ्यांचे नामांकन किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते. पूर्वी यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरायची गरज नव्हती, तरी पण काही वर्षांनंतर आवेदनपत्रासोबत एमकार्ड आले होते. एमकार्डद्वारे विद्यापीठात नामांकन होऊन जायचे. परंतु, आता विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये बीए, बीकॉम, बीएससी आणि अभियांत्रिकी शाखेत प्रथम वर्षाला प्रवेशित झाला की त्याला आपले नामांकन विद्यापीठात करावे लागणार आहे. या शैक्षणिक सत्रापासून आता विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन अर्ज भरावे लागणार असल्याचे संकेत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिले आहेत. पुढे याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार असून त्यांना नामांकन लक्षात ठेवायला जड जाणार नाही.
विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षांची आवेदनपत्र ही विद्यार्थी मॅन्युअली भरून देत. भरलेल्या आवेदनपत्र विद्यापीठात किंवा महाविद्यालयात दाखल करावी लागत आहे. याचा विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास व्हायचा. यामध्ये विद्यार्थ्यांचे श्रम, अभ्यासाची वेळ, व आर्थिक खर्च व्हायचा. आता हिवाळी 2019 परीक्षा सत्रापासून विद्यार्थ्यांना परीक्षांची आवेदनपत्र ऑनलाइन भरावी लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वाचणार आहे.

15 पासून नामांकन व परीक्षा अर्ज ऑनलाइन
या शैक्षाणिक सत्रापासून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांकडून नामांकन अर्ज ऑनलाइन भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात विद्यार्थ्यांचा फायदा होणार असून त्यांचा वेळ व पैसा वाचेल. तसेच हिवाळी परीक्षांचे अर्ज ऑनलाइन भरणे लागणार असून याचे काम लर्निंग स्पायरल कंपनीला दिले आहे. ऑनलाइन आवेदन भरण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टनंतर लगेच सुरू करणार.
-डॉ. एच. आर. देशमुख
परीक्षा संचालक, अमरावती विद्यापीठ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati University Registration, Exam Application Form Online Now