अमरावती विद्यापीठ देणार शिक्षकांना कौशल्याचे धडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

अकोला - महाविद्यालयात कौशल्य शिक्षणाचे योग्य मार्गदर्शक निर्माण व्हावे, या उद्देशाने देशभरातील शिक्षकांना अमरावती विद्यापीठ कौशल्याचे धडे देणार आहे. हा उपक्रम कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास केंद्रातर्फे देशभरातील विविध विद्यापीठामध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. यामध्ये अमरावती विद्यापीठाला कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र मिळाले असून, देशभरातील हे एकमेव केंद्र असल्याची माहिती आहे. या केंद्राच्या माध्यमातून देशभरातील शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल. कौशल्य विकास प्रशिक्षण केद्रांतर्गत कौशल्यावर आधारीत विविध तज्ज्ञांची व्याख्याने, विविध कौशल्याबाबत सविस्तर माहिती, त्याचे प्रशिक्षण, त्यावर आधारीत रोजगार, स्वयंरोजगार व्हर्च्युअल पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Web Title: amravati university teacher learning