अमरावती विद्यापीठ वापरणार रद्दी उत्तरपत्रिका

अमरावती विद्यापीठ वापरणार रद्दी उत्तरपत्रिका

अकाेलाः सहा वर्षांपासून रद्दीत पडून असणाऱ्या उत्तरपत्रिका स्वस्त दरात उपलब्ध हाेत असल्याने त्या परीक्षेसाठी वापरण्याच विचार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ करीत अाहे. या उत्तरपत्रिकांचा दर्जा तपासण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने समितीही गठीत केली अाहे.

2012-13 या अार्थिक वर्षात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मेर्सस विशाल पेपर कन्व्हरटर या पुरवठादारने यांनी 14 लाख 50 हजार नग 24 पानी उत्तरपत्रिका दर हजारी 2 हजार 781 रूपये, 28 लाख 27 हजार नग 8 पानी पुरवणी उत्तरपत्रिका दर हजारी 1 हजार 31 रूपये अाणि 50 हजार नग 8 पानी प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका दर हजारी 1 हाजर 41 रूपये या भावाने विद्यापाठाला पुरविणार हाेते. त्यावेळी मागणीप्रमाणे 63 हजार 24 पानी उत्तरपत्रिका 9 लाख 16 हजार 8 पानी उत्तरपत्रिका मंजूर दराने स्विकारण्यात अाल्या हाेत्या. उर्वरीत उत्तरपत्रिका विद्यापीठाने अस्विकृत केल्या .

16 जानेवारी 2018 ला कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या दालनात झालेल्य बैठकीत पुरवठादाराने उत्तरपत्रिकांचे विविध गठ्ठ्यांमधून रॅंडमली सॅम्पल विद्यापीठात अाणावे. त्याची तपासणी विद्यापीठ करेल व वापरण्यायाेग्य असल्यास जळगाव येथील गाेदमातील उत्तरपत्रिका विद्यापीठास पाठविण्यात याव्यात असे ठरले.

12 मार्च अाणि 27 एप्रिल 2018 ला समितीचा अहवाल सादर झाल्यावर 11 जून ला अंतीम अहवाल सादर झाला. या अहवालात 7 लाख नग 24 पानी उत्तरपत्रिका 19 लाख 46 हाजार 700 रूपयात तसेच 5 लाख 50 हजार 8 पानी पुरवणी उत्रपत्रिका 5 लाख 67 हजार 50 रूपयात पुरवठादर देण्यास तयार असल्याचे स्पष्ट करण्यात अाले हाेते. अाता 4 अाणि 5 सप्टेंबरला झालेल्‍या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या उत्तरपत्रिका प्रती नग 1.03 रूपये दराने देण्यास पुरवठादार तयार असल्याचे स्पष्ट झाले. यात 7 लाख नग 24 पानी उत्तरपत्रिका 7 लाख 21 हजारात तर 5 लाख 50 हजार नग 8 पानी उत्तरपत्रिका 5 लाख 66 हजार 500 रुपयात पुरवठादार देण्यास तयार असल्याचे सांगण्यात अाले. व्यवस्थापन परिषदेने या उत्तरकत्रिकांचा दर्जा तपासण्यासाठी नव्याने समिती गठीत केली अाहे.

या निर्णयामुळे विद्यापीठाचा पैसा वाचेल. समिती सर्व तपासून निर्णय घेईल, असे मत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकार यांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com