अमरावती : वाहन दरीत कोसळून १ ठार, २८ जखमी

टेंब्रूसोंडा गावाजवळील घटना
accident news
accident news

चिखलदरा/जामली : परतवाडाकडे जात असताना चिखलदरा ठाण्याच्या हद्दीत टेंब्रूसोंडा या गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वळणावर वाहन रस्त्याखाली उतरून उलटले. या अपघातात एकूण २९ जण जखमी झाले. जखमींपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. सुरेश जामूनगर (वय ३५, रा. आढाव, ह. मु. कुलंगणा), असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघाताच्या वेळी एमएच २७ एसी ०३५७ क्रमांकाच्या क्रुझरमध्ये क्षमतेपेक्षा आठ ते दहा जण जास्त बसले होते. त्यामुळे घटनास्थळी चालकाचे नियंत्रण सुटून वाहन खाली कोसळून अपघात झाल्याचे प्रथमदर्शीनी सांगितले. अपघातातील जखमींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने उपचाराकरिता अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उर्वरित गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.

अंजू संजू कास्देकर (वय २३), पद्मा किसन बेलसरे (वय २१), हरीश राजेश घावडे (वय २५), बेबी अरुण कास्देकर (वय १४), लक्ष्मी शिवराज कास्देकर (वय ३४), संजय रामप्रसाद बेलसरे (वय १६), शंकर गंगाराम कास्देकर (वय १८), बाबूराव बेलसरे (वय ३२), शोभा मौसी जावरकर (वय ४०), ललिता रामराव कास्देकर (वय १६), सुकरासा लक्षा बेलसरे (वय ३३), आनंद कास्देकर (वय १७) यांच्यासह अन्य काही प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वाहन बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला. या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

श्रमतेपेक्षा जास्त प्रवासी

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून मेळघाटातील शेतांमध्ये निंदण्याचे काम सुरू आहे. पाहिजे त्याप्रमाणात काम नसल्यामुळे सर्व मजूर अंजनगाव तालुक्यातील वागडोह, जनुना, धाडी, पथ्रोट या भागात कामाला जात असतात. असे असले तरी मेळघाटातील मजुरांची वाहतूक वाहनांनी केली जात आहे. एका वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त लोकांची वाहतूक करण्यात येते. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळेच अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com