

Amravati Ventilator Purchase
esakal
अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी झालेल्या २० व्हेंटिलेटरच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असून १३ लाखांचे व्हेंटिलेटर २२.५ लाख रुपयांत खरेदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. सोबतच त्यांनी पुरावेही सादर केले आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत ही खरेदी करण्यात आली होती असे त्यांनी म्हटले आहे.