
अमरावतीत एका ३५ वर्षीय महिला पोलिसाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडालीय. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वडाळी इथल्या गुरुकृपा कॉलनी परिसरात ही घटना घडली. आशा राहुल तायडे असं मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.