अमरावती: गणेश विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू

शरद केदार
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

मंगळवारी शिरजगाव क़सबा येथील गणेशाचे विसर्जन होत होते. पोलिसांनी सुद्धा विसर्जनाच्या ठिकाणी कड़क बंदोबस्त ठेवला होता. विशालने मात्र आपला घरचा गणपती त्या ठिकाणी न विसर्जित करता त्याने आपल्या शेता जवळ नेउन मेघा नदीमध्ये विसर्जन करिता गेला होता. त्याच्यासोबत त्याच्या घरा शेजारचा लहान मुलगा होता.

चांदूर बाजार : सर्वत्र गणेशोत्सव विसर्जन सुरवात असताना चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील दुःखद घटना समोर आली आहे. दुसऱ्याला वाचविण्यास गेलेला तरुण विशाल सातपुते (वय 22) याचा मुत्यू झाला.

मंगळवारी शिरजगाव क़सबा येथील गणेशाचे विसर्जन होत होते. पोलिसांनी सुद्धा विसर्जनाच्या ठिकाणी कड़क बंदोबस्त ठेवला होता. विशालने मात्र आपला घरचा गणपती त्या ठिकाणी न विसर्जित करता त्याने आपल्या शेता जवळ नेउन मेघा नदीमध्ये विसर्जन करिता गेला होता. त्याच्यासोबत त्याच्या घरा शेजारचा लहान मुलगा होता. त्याला वचविण्यासाठी विशाल गेला असता त्याचा पाय शिल्प होऊन तो खोल पाण्यामध्ये पडला व त्याला त्यातून बाहेर निघता आले नाही. त्यामुळे त्याचा जागीच मुत्यू झाला. त्यामुळे गावामध्ये शोककळा पसरली होती.

Web Title: Amravati youth drown in chandur bazar