अमरावतीत युवकाने दिली भावाचा शेतात खून करण्याची धमकी

संतोष ताकपिरे
Sunday, 20 September 2020

महत्त्वाची बाब म्हणजे शासकीय बालगृहात चोवीस तासांसाठी राखणदार असतो. परंतु, सदर बालक भरदिवसा येथून निघून जाताना कुणाच्याच निदर्शनास कसा आला नाही. हा मुख्य प्रश्‍न उपस्थित होतो. काही दिवसांपूर्वी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील एका संस्थेच्या मुलींच्या बालगृहातूनही एक अल्पवयीन मुलगी सहज बाहेर पडली होती.

अमरावती : शहरातील मुलांच्या शासकीय निरीक्षण व बालगृहात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलाने पळ काढला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पोलिसांनी त्यास १६ सप्टेंबर रोजी बालगृहात दाखल केले होते.

शुक्रवारी दुपारी येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वरच्या माळ्यावर पाहणी केली असता अल्पवयीन मुलगा तेथे दिसला नाही. आसपास शोधही घेतला. परंतु, तो दिसला नाही. अखेर निरीक्षण व बालगृहाचे निवृत्ती सुरेश जटाले यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार केली असता अल्पवयीनाचे कुणीतरी अपहरण केल्याची शक्‍यता व्यक्त केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

क्लिक करा - सोने खरेदीकडे नागरिकांची पाठ; भाव घटले तरीही ग्राहक मिळेना; जाणून घ्या

महत्त्वाची बाब म्हणजे शासकीय बालगृहात चोवीस तासांसाठी राखणदार असतो. परंतु, सदर बालक भरदिवसा येथून निघून जाताना कुणाच्याच निदर्शनास कसा आला नाही. हा मुख्य प्रश्‍न उपस्थित होतो. काही दिवसांपूर्वी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील एका संस्थेच्या मुलींच्या बालगृहातूनही एक अल्पवयीन मुलगी सहज बाहेर पडली होती. सुदैवाने काही जागरुक नागरिकांच्या मदतीने ती काही तासांतच सुरक्षित सापडली होती.

भावाचा शेतात खून करतो

ग्रामीण भागात युवतींसह विवाहितांशी बळजबरीचा प्रयत्न करण्याच्या घटना वाढत असल्याने महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण आहे. अंजनगावसुर्जी, कुऱ्हा आणि तळेगावदशासर ठाण्याच्या हद्दीत दोन विवाहितांसह एका युवतीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला. भंडारज ते अंजनगावसुर्जी मार्गावर संशयित आरोपी मारोती महादेव पातोंडे (वय ५४) याने युवतीला अडवून बळजबरीचा प्रयत्न केला. शिवाय भावाचा शेतात खून करतो, अशी धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून अंजनगावसुर्जी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

घरात घुसून छेडखानी

कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीतील एका गावात महिला मुलांसह घरात असताना संशयित आरोपी सतीश रतन बंड (वय ३५) याने छेडखानी केली. पीडितेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी बंडविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिसरी घटना तळेगावदशासर ठाण्याच्या हद्दीत एका गावात घडली. येथील विवाहितेच्या (वय ३२) घरात घुसून संशयित आरोपी प्रवीण रामटेके (वय २८) याने छेडखानी केली. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामटेकेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati youth threatens to kill