दोन मुलांच्या पित्याने फसवली तरुणी, प्रेमप्रकरण समजताच रुसली पत्नी, मग घडला हा प्रकार...

Amravati's married policeman has reached the police station for extra marital affair
Amravati's married policeman has reached the police station for extra marital affair

अमरावती : तो राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत... काही वर्षांपूर्वी विवाह झाला... त्याला दोन मुलेही आहेत... तरीही त्याने लग्नाबाहेरील संबंध ठेवत एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले... युवतीला विविध स्वप्न दाखवून प्रेम करण्यास बाध्य केले... मात्र, ही बाब पत्नीला समजली आणि हे प्रकरण पोहोचले पोलिस ठाण्यात... मात्र, शेवट गोड झाला... हा संपूर्ण घटनाक्रम घडला जागतिक महिला दिनी म्हणजे रविवारी 8 मार्च रोजी... 

रविवारी जागतिक महिलादिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान व्हावा म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजित केले जातात. एवढेच नव्हे त्यांच्याकडे विविध कार्याचा पदभार दिला जातो. यातून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न असतो. अमरावतीच्या आयुक्तालयात महिला अधिकाऱ्यांकडे पोलिस निरीक्षक म्हणून दिवसभराचा प्रभार सोपविला गेला होता. असे असतानाच फ्रेजरपुरात ठाण्यात हे प्रकरण पोहोचले. 

दोन मुलांचा पिता असलेला पोलिस शिपायाच्या आयुष्यात नव्याने प्रवेश केलेली तरुणी तिच्या पालकांसह फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात पोहोचली. प्रेमप्रकरणाची माहिती सांगताच पोलिसांनाही धक्‍का बसला. दोन मुलांच्या वडिलांना असे करण्याचे सुचलेच कसे, असा प्रश्‍न ते एकमेकांना विचारत होते. तसेच युवतीही त्याच्या प्रेमात कशी पडली असा प्रश्‍नही त्यांना पडला. 

दोघांची काढली समजूत

पोलिस ठाण्यात आलेले प्रकरण मिटविण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांची समजूत घालण्यास सुरुवात केली. पत्नी असताना तरुणीच्या प्रेमात पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला प्रेमप्रकरण सुरू ठेवल्यास वैवाहिक आयुष्यावर काय परिणाम होईल, भविष्यात त्याला कशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल, याची पूर्वकल्पना देण्यात आली. तसेच त्याच्या व तिच्या नातेवाइकांनीही दोघांची समजूत काढली.

घेतले लिखित आश्‍वासन

पोलिस व नातेवाईकांनी दोघांची समजूत काढल्यानंतर पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात डोकावणार नाही, असे लिखित आश्‍वासन फ्रेजरपुरा पोलिसांनी घेतले. भविष्यात अत्याचार किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यास नोकरीवर विपरित परिणाम होऊ शकतो, याची पूर्वकल्पना पोलिसांनी कर्मचाऱ्याला करून दिली. 

पत्नी रुसली अन्‌ समजलीही

दोन मुलांचा बाप असलेल्या पतीचे कारस्थान समजल्यानंतर पत्नी चांगलीच रुसली. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसाची पत्नी रुसून घरून निघून गेली होती. ती पतीला सोडचिठ्ठी देते की काय? असाच हावभाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होतो. मात्र, पोलिसांनी समजूतदारपणाने घेतलेल्या निर्णयामुळे शेवट गोड झाला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com