esakal | साखरपुड्यासाठी केला साठ किलोमीटरचा प्रवास अन्‌ 'कोरोना'च्या भीतीमुळे घेतला हा निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

Unique wedding ceremony took place in Yavatmal

सोयरिकी सुरू असताना लग्न मे महिन्याच्या 14 तारखेला तर साखरपुडा रविवारी (ता. आठ) करण्याचे ठरले. ठरल्यानुसार देशमुख कुटुंबीय मोजक्‍या पाहुण्यांना घेऊन पुसदला कदम यांच्या घरी सारखपुड्यासाठी आले. दुपारी सारखपुड्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर दोन्ही कुटुंबाकडच्या नातेवाईकांनी जेवण केले. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. 

साखरपुड्यासाठी केला साठ किलोमीटरचा प्रवास अन्‌ 'कोरोना'च्या भीतीमुळे घेतला हा निर्णय...

sakal_logo
By
शशिकांत जामगडे

पुसद (जि. यवतमाळ) : सद्या देशात कोरोनाची चांगलीच दहशत पसली आहे. चीनमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इतर देशातही करोना पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकजण बाहेरगावी जायला, लग्न सोहळा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी होळीही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर कोरोनाबाबत सुरू असलेली अफवा वेगळीच... याच अफवेमुळे आगळा-वेगळा विवाह पार पडला... 

रामकिसनराव अवचार देशमुख (रा. किनखेडा, जि. वाशीम) हे सधन शेतकरी आहेत. त्यांच मुलगा शुभम हा बी.फार्मपर्यंत शिकला आहे. उच्चशिक्षित असलेला शुभमचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्‍यातील शेतकरी व हल्ली पुसद येथे वास्तव्यास असलेले कैलासराव कदम यांची उच्चशिक्षित असलेली दिपाली हिच्याशी जुळला.

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत; कोणत्या वादग्रस्त निर्णयामुळे नव्हे तर...

सोयरिकी सुरू असताना लग्न मे महिन्याच्या 14 तारखेला तर साखरपुडा रविवारी (ता. आठ) करण्याचे ठरले. ठरल्यानुसार देशमुख कुटुंबीय मोजक्‍या पाहुण्यांना घेऊन पुसदला कदम यांच्या घरी सारखपुड्यासाठी आले. दुपारी सारखपुड्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर दोन्ही कुटुंबाकडच्या नातेवाईकांनी जेवण केले. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. 

दुसरीकडे वराकडील प्रा. प्रतापराव देशमुख, रामकिसन अवचार, भागवतराव अवचार व वर शुभम हे करोना विषाणूवर चर्चा करीत होते. अनेकांना या रोगामुळे जीव गमवावा लागला आहे. हळुहळू हा रोग भारतात येत आहे. यामुळ अनेकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्यास सुरुवात केली आहे. तसेच या रोगामुळे जगभरात सार्वजनिक उत्सव टाळण्याचे आवाहन केले जात असल्याचे कोणीतरी म्हटले. ऐन लग्नावेळी कोरोनामुळे बंदी आल्यास लग्न पुढे ढकलावे लागू शकते, असा प्रश्‍न चर्चेदरम्यान उपस्थित झाला आणि लग्नसोहळा पार पडला. 

वधू पित्याने ठेवला प्रस्ताव

कोरोनावर झालेल्या चर्चेनंतर घाबरलेल्या वधू पित्याने विवाह सभारंभ साखरपुड्यातच आटोपण्याची विनंती वधूच्या पित्यांना केली. त्यांनी हा विचार वडील पंजाबराव कदम, दिनेश चौथमल, आनंदराव कदम, बंधू, वहिणी, पत्नी व नववधूकडे मांडला. चर्चेनंतर वधूकडच्या मंडळींनी लग्नास होणार दिला अन्‌ सुरू झाली लग्नाची तयारी व लगबग.

जाणून घ्या - माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, नाही तर तुला जाळतो; त्याने दिली धमकी

भीतीपोटी निर्माण झाला वेगळा आदर्श

वधू कडच्या मंडळींनी लग्नास होणार दिल्यानंतर ताबडतोब नवरदेवाचे कपडे, नवरीचा साज, मंगळसूत्र आदी साहित्यांची खरेदी करण्यात आली. अवघ्या काही क्षणात लग्नाची तयारी करण्यात आली. पाहता-पाहता लग्नघटिका समीप आली आणि शुभमंगल सावधान झाले. कोरोनोमुळे का होईना दोन्ही कुटुंबांनी रुढी, चालीरीती, परंपरा यांना फाटा देऊन साखरपुड्यातच लग्न करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.