esakal | .. अन्‌ मुस्कानच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ! 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

4 जून 2020 रोजी दुपारच्या सुमारास मुस्कानला एक फोन आला. संपर्क साधणाऱ्याने स्वत:ला कोटक महिंद्रा बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी केली. तिने घेतलेले एटीएम कार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. तिच्याकडून एटीएमकार्डवरील गोपनीय क्रमांक विचारला. त्यानंतर तिच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी तिने शेअर केला.

.. अन्‌ मुस्कानच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती, : दुचाकी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून एका दुकानात काम केले. ऐंशी हजार बॅंकेत जमाही केले. परंतु तोतयाने तिला जाळ्यात अडकवून खात्यातील ऐंशी हजार उडविले. परंतु घटनेनंतर दीड तासात ती आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात पोहोचली. अन.. त्या गरीब मुलीला त्याचा रिझल्टसुद्धा मिळाला. कारण उडविलेल्या रकमेपैकी 74 हजार 500 रुपये तिच्या खात्यात जमा झाल्याने ती सुखावली. 

हे वाचा— मुद्रण व्यवसायही ठप्प, गडचिरोलीतील व्यावसायिक चिंतेत 


मुस्कान अनिलकुमार धिंग्रा (वय 22, रा. रामपुरी कॅम्प) ही तिची आई आणि भावासोबत सोमवारी (ता. 15) सायबर पोलिसांचे आभार मानायला आली. मुस्कान ही सामान्य कुटुंबातील युवती. तिने एका ड्रायफुडच्या दुकानात नोकरी केली. तिला एक दुचाकी घ्यायची होती. अडीच ते तीन वर्षामध्ये तिने मिळालेल्या वेतनाची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा केली. जवळपास ऐंशी हजार रुपये जमा झाले. ती नवीन दुचाकी घेण्यासाठी शोरुममध्ये जाणारसुद्धा होती. 4 जून 2020 रोजी दुपारच्या सुमारास मुस्कानला एक फोन आला. संपर्क साधणाऱ्याने स्वत:ला कोटक महिंद्रा बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी केली. तिने घेतलेले एटीएम कार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. तिच्याकडून एटीएमकार्डवरील गोपनीय क्रमांक विचारला. त्यानंतर तिच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी तिने शेअर केला.

हे वाचा— लग्न कर्तव्य आहे का? चांगली वधू आहे, असा फोन आल्यास सावधान!
 

त्यामुळे तोतयाने काही मिनीटातच फोन पेवरून वेगवेगळ्या व्हॉलेटला प्रत्येकी 25 हजार रुपयांचे तीन आणि 5 हजार रुपयांचे एक असे चार ट्रान्झॅक्‍शन केले. खात्यातून ऐंशी हजार रुपये बेपत्ता झाल्याचा मॅसेज मिळाल्याने तिला धक्काच बसला. तिने दीड तासात सायबर ठाणे गाठले. सायबर पोलिसांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. तोपर्यंत वेगवेगळ्या व्हॉलेटला गेलेल्या ऐंशी हजारांपैकी साडेपाच हजार रुपये तोतयांनी काढून घेतले होते. उर्वरित रक्कम थांबविण्याचे आदेश सायबर पोलिसांनी दिले. त्यामुळे गेलेली रक्कम पोलिसांच्या मदतीने मुस्कानच्या खात्यात परत आली. पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे, हेडकॉन्स्टेबल दीपक बदरके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मुस्कानच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. 

कॅशबॅकचे आमिष, शिवाय वेगवेगळ्या लिंक पाठवून डाऊनलोड करायला लावले, बॅंक खात्याचे अपडेट विचारणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून प्रत्येकाने सावध राहावे, ऑनलाइन व्यवहार करतांना काळजी घ्यावी. 
- प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक सायबर ठाणे, अमरावती. 

loading image