... अन्‌ महिलेने काढला पळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : रस्त्याने पायदळ जाणाऱ्या महिलेस यवतमाळला सोडून देण्याचे आमिष दाखवून वाईट उद्देशाने कच्च्या रस्त्याने नेले. दुचाकीचालकाचा हेतू लक्षात आल्याने महिलेने त्याच्या तावडीतून सुटका करून पळ काढला. ही घटना शनिवारी (ता.19) दुपारी साडेचारला वाघाडी शिवारातील बहिरम मंदिराच्या उतारात घडली.

अजय सुधाकर रापर्तीवार (वय 45, रा. यवतमाळ) असे संशयित व्यक्तीचे नाव आहे. वाघाडी शिवारातून एक महिला पायदळ रस्त्याने जात होती. संशयित मागाहून आला. "तू चल, तुला यवतमाळला सोडून देतो', असे म्हणत दुचाकीवर बसविले. वाहन कच्च्या रस्त्याने नेऊन काही अंतरावर थांबविली. इकडे कशाला आणले म्हणताच महिलेला वाईट उद्देशाने पकडले. महिलेने कशीबशी आपली सुटका करून घेत पळ काढला. यावेळी तिला शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने यवतमाळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून सुधाकर रापर्तीवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

बायपास धोकादायकच
बायपासवर प्रेमीयुगुलांची कायम वर्दळ बघावयास मिळते. कॉलेज, शिकवणीला जाण्याच्या उद्देशाने घरून निघणारी मुले बायपासने जातात. जंगल परिसर असल्याने एकांतवास साधतात. यापूर्वी अत्याचाराच्या घटनादेखील या परिसरात घडल्या आहेत.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... And the woman escaped from her coffin