अंगणवाडी पर्यवेक्षिका एसीबीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

भंडारा : साकोली येथील महिला बालविकास अधिकारी कार्यालयातील अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रीती पुरुषोत्तम चारमोडे (वय 57) हिला अंगणवाडी सेविकेकडून अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

भंडारा : साकोली येथील महिला बालविकास अधिकारी कार्यालयातील अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रीती पुरुषोत्तम चारमोडे (वय 57) हिला अंगणवाडी सेविकेकडून अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारकर्ती ह्या पाथरी येथे अंगणवाडी येथे सेविका म्हणून कार्यरत आहेत. अंगणवाडीला इंधनाच्या खर्चापोटी एकूण 17 हजार 690 रुपये शासनाकडून मंजूर झाले होते. हे इंधनबिल मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून पर्यवेक्षिका प्रीती चारमोडे हिने तक्रारकर्तीस 4 हजार 600 रुपयांची मागणी केली. या प्रकरणी सेविकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे तक्रार केली. पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी यांनी तक्रारीची गोपनीयरीत्या शहानिशा करून आज गुरुवारी सापळा रचला. पर्यवेक्षिका प्रीती चारमोडे हिला लाचेचा पहिला हप्ता म्हणून अडीच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना चमूने पकडले. पोलिस ठाणे, साकोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या लाखनी येथील निवासस्थानाची झडती घेणे सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुदलवार, पोलिस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, पुरुषोत्तम अहेरकर, गणेश पडवार, पराग राऊत, सचिन हलमारे, कोमल बनकर, आश्‍विन गोस्वामी, सुनील हुकरे, रोशनी पटले यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadi Supervisor trapped accepting bribe