मध्यप्रदेशातून तेलंगणात जनावरांची तस्करी; यवतमाळमध्ये पर्दाफाश, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

चेतन देशमुख
Tuesday, 13 October 2020

गुरुवारी (ता.आठ)सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरटीओ चेकपोस्टवर लावण्यात आलेले बॅरिकेट्‌स उडवून कंटेनरने पळ काढला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून तेलंगणा सीमेवर अडविले.

पाटणबोरी (जि. यवतमाळ) : मध्यप्रदेशातून तेलंगणात होणाऱ्या जनावरांच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करून 40 गोवंशासह एकूण 21 लाख दहा हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी तीन संशयितांना अटक करण्यात आली. 

हेही वाचा - खासदार साहेबऽऽ हे बरं नव्हं; नवनीत राणा यांनी धावत्या एसटीच्या दारात उभे राहून दिली प्रतिक्रिया

गुरुवारी (ता.आठ)सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरटीओ चेकपोस्टवर लावण्यात आलेले बॅरिकेट्‌स उडवून कंटेनरने पळ काढला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून तेलंगणा सीमेवर अडविले. त्यातील चालक, वाहन, मजूर अशा तिघांना ताब्यात घेतले. ट्रकची पाहणी केली असता, दोन कप्प्यात 40 बैल बांधून असल्याचे दिसले. आतमध्ये चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. सहा लाख रुपये किमतीची जनावरे, 15 लाखांचा ट्रक, असा एकूण 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी मोहम्मद कुमेल मोहम्मद नन्ना (वय 30), मोहम्मद रईस मोहम्मद गफूर (वय 60), दानेश जहीर कुरेशी (वय 20, सर्व रा. मध्यप्रदेश), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्घ पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई एसडीपीओ प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक चापाईतकर, सुशील शर्मा, साहेबराव बेले, अफजल खॉ पठाण, उमेश कुमरे, राजू बेलयवार आदींनी केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: animal smuggling exposed in yavatmal