चंद्रपूरच्या महापौरपदी अंजली घोटेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

उपमहापौरपदी फुलझेले - शिवसेना, मनसेचे समर्थन
चंद्रपूर - महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या अंजली घोटेकर, तर उपमहापौरपदी अनिल फुलझेले यांची निवड झाली. भाजपला पहिल्यांदाच पूर्ण बहुमत मिळाले आहे.

उपमहापौरपदी फुलझेले - शिवसेना, मनसेचे समर्थन
चंद्रपूर - महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या अंजली घोटेकर, तर उपमहापौरपदी अनिल फुलझेले यांची निवड झाली. भाजपला पहिल्यांदाच पूर्ण बहुमत मिळाले आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत अंजली घोटेकर यांना 42 मते, बसपच्या यादव यांना 24 मते मिळाली. कॉंग्रेसने बसपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

चंद्रपूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 66 पैकी 36 नगरसेवक भाजपचे आहेत. महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या वेळी सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी भगवे फेटे घातले होते. भाजपचेच अनिल फुलझले हे बिनविरोध उपमहापौर झाले. या वेळी स्थायी समिती सदस्यांचीही निवड करण्यात आली. 16 सदस्य त्यासाठी निवडण्यात आले. निवडणुकीत भाजपला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी समर्थन दिले.

अंजली घोटेकर या दुसऱ्यांदा महापालिकेत निवडून आलेल्या आहेत. घोटेकर यांनी भाजपच्या वॉर्ड अध्यक्ष म्हणून संघटनात्मक कार्यास सुरवात केली. त्यानंतर भाजप महिला आघाडीच्या चंद्रपूर तालुकाध्यक्ष, जिल्हा संघटक, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. महापौर, उपमहापौर निवडीनंतर आमदार नाना श्‍यामकुळे यांच्या नेतृत्वाखाली विजयी मिरवणूक काढण्यात आली. भाजपचे सर्व नगरसेवक त्यात सहभागी झाले होते.

Web Title: anjali ghotekar chandrapur mayor