मिहान पुनर्वसनासाठी आणखी 992 कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नागपूर : शहरातील मिहान प्रकल्पामध्ये भूसंपादन करणे व विकासकार्ये तसेच पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमातळ विकास कंपनीने सादर केलेल्या 992 कोटींच्या खर्चास आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यापूर्वी 1,508 कोटींना शासनाने मान्यता दिली होती. आत एकूण 2,500 कोटींचा खर्च या प्रकल्पात करणे सुलभ झाले आहे.

नागपूर : शहरातील मिहान प्रकल्पामध्ये भूसंपादन करणे व विकासकार्ये तसेच पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमातळ विकास कंपनीने सादर केलेल्या 992 कोटींच्या खर्चास आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यापूर्वी 1,508 कोटींना शासनाने मान्यता दिली होती. आत एकूण 2,500 कोटींचा खर्च या प्रकल्पात करणे सुलभ झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे हा वाढीव खर्च मंजूर झाला. मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आधी 644 कोटींना प्रशासकीय मान्यता शासनाने दिली होती. त्यानंतर आज 235.83 कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली. दिवाणी न्यायालयातील वाढीव नुकसानभरपाईबाबतचे कलम 18 नुसार दाखल झालेल्या दाव्यांसाठी 500 कोटी वाढीव निधी आता उपलब्ध होणार आहे. तसेच दिवाणी न्यायालयातील वाढीव नुकसानभरपाईसाठी कमल 28 नुसार येणाऱ्या 95 कोटींच्या अतिरिक्त खर्चासही मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादनासाठी 111.98 कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. भारतीय वायुदलाच्या मौजा जयताळा येथील पोच रस्ता बांधकामासाठी 50 कोटी मिळणार आहे. त्या रकमेचा आणि प्रकल्प खर्चात 10 टक्के वाढ गृहीत धरून होणारी रक्कम म्हणून 99.28 कोटी रुपयांचा या 992 कोटी रुपयांत समावेश आहे. आतापर्यंत शासनाने या प्रकल्पाच्या खर्चासाठी 2,500 कोटींना मान्यता दिली आहे. भूसंपादन प्रकरणी 55 आणि 276 निकाली निघालेल्या प्रकरणात निधीअभावी वाटप होऊ शकले नव्हते.
न्यायालयाच्या निकालानुसार 545 प्रकरणांपैकी 214 प्रकरणांत आजपर्यंत 117 कोटींचा वाटप करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 164 प्रकरणांमध्ये वाढीव मोबदल्याची रक्कम परिगणित करण्यात आली आहे. ही रक्कम 150 कोटी आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये तसेच न्यायालयात प्रलंबित प्रकरणांमध्ये सुमारे 350 कोटी मिळून ही रक्कम 500 कोटींपर्यंत जाईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 992 crore for mihan