आणखी एका आरोपीला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नागपूर - व्हेरायटी चौकातून 17 वर्षीय मुलीला ऑटोने अपहरण केल्यानंतर सुगतनगरातील निर्माणाधीन इमारतीत सहा नराधमांनी रात्रभर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी सोमवारी आणखी एका आरोपीला अटक केली, एक आरोपी अद्याप फरार आहे. आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. सुरेश दामोदर भारसागडे (वय 60, रा. नारी, म्हाडा कॉलनी) असे सातव्या आरोपीचे नाव आहे. 

नागपूर - व्हेरायटी चौकातून 17 वर्षीय मुलीला ऑटोने अपहरण केल्यानंतर सुगतनगरातील निर्माणाधीन इमारतीत सहा नराधमांनी रात्रभर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी सोमवारी आणखी एका आरोपीला अटक केली, एक आरोपी अद्याप फरार आहे. आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. सुरेश दामोदर भारसागडे (वय 60, रा. नारी, म्हाडा कॉलनी) असे सातव्या आरोपीचे नाव आहे. 

सदरमधील शासकीय महिला वसतिगृहातून तीन अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. त्यापैकी एक मुलगी स्मिता (बदललेले नाव) ही शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता व्हेरायटी चौकात आली. तिला भूक लागल्याने कृष्णा नामक ऑटोचालकाने तिला नास्ता दिला आणि व्हेरायटी चौकातील चप्पल दुकानदार फिरोज अहमद जमील अहमद (वय 40, रा. नालसाहब चौक) याच्या दुकानावर सोडले. त्याने ऑटोचालक स्वप्निल जवादे, मयूर बारसागडे, अतुल उर्फ नरेश यांना बोलावून घेतले. मुलीला जेवण देण्याचे आमिष दाखवले. तिला सुगत नगरातील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेले. तेथे प्रलय मेश्राम आणि सौमील नरखेडकर या दोघांना फिरोजने बोलावून घेतले. त्या निर्माणाधीन इमारतीवर सुरेश भारसागडे आणि साखरे हे दोघे चौकीदार होते. त्या दोघांनी सहाही आरोपींना इमारतीचा वरचा माळा उपलब्ध करून दिला आणि 100 रुपये घेतले. पहाटे पाच वाजेपर्यंत त्या मुलीवर सहाही नराधमांनी लैंगिक अत्याचार केला आणि व्हेरायटी चौकात सोडून पळ काढला. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तासाभरात सहा आरोपींना अटक केली. सोमवारी चौकीदार सुरेश भारसागडे याला अटक केली. साखरेचा शोध सुरू आहे. 

तीनही मुली गसवल्या 
सदरमधील शासकीय महिला वसतिगृहातून 19 एप्रिलला तीन मुली पळून गेल्या होत्या. त्या तीनही मुलींना शोधण्यात सदर पोलिसांना यश आले. त्यापैकी एका मुलीवर गॅंग रेप झाल्यानंतर पोलिस खडबडून जागी झाले होते. त्यामुळे आटापिटा करीत पोलिसांनी डोळ्यात तेल घालून मुलींचा शोध घेतला. 

कपडे फेकून पुरावा नष्ट 
स्मिताच्या अंगावर जे कपडे होते, ते कपडे लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपींनी फेकून दिले. तिला नवीन कपडे घेऊन देण्यात आले. तिला जिन्स पॅंट आणि टी-शर्ट आरोपींनी घेऊन दिले. आरोपींमध्ये प्रलय मेश्राम हा ईस्टर्न कोलफिल्डमध्ये इंजिनिअर, तर फिरोजचे दुकान आहे. सौमीलचे मोठा पानठेला आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी कपडे फेकून दिले. 

पीडित मुलगी अनाथ 
पीडित मुलगी स्मिता ही अनाथ आहे. तिच्या आईने आत्महत्या केली, तर वडिलांचा दारूमुळे मृत्यू झाला. त्यावेळी ती आठ वर्षांची होती. तिच्या मामाने तिला अनाथालयात सोडून पळ काढला होता. श्रद्धानंद अनाथालय, धंतोलीतील अनाथालय आणि शेवटी शासकीय महिला वसतिगृहात ती राहत होती. मात्र, वसतिगृहात होणाऱ्या छळाला कंटाळून ती पळून गेल्याची चर्चा आहे. 

Web Title: Another accused arrested