वॉट्‌सऍपच्या ग्रुपवर पुन्हा जोडण्यासाठी अर्ज

file photo
file photo

टेकाडी (जि.नागपूर) :  सोशल मीडियाचा वापर करत ताशेरे ओढण्याचे प्रमाण एरवी वॉट्‌सऍप ग्रुप किंवा फेसबुकच्या माध्यमातून वाढले आहे. वॉट्‌सऍप ग्रुप बनविताना खबरदारी म्हणून ग्रुप ऍडमिनकडून अनेक नियमदेखील लावले जातात. ग्रुपमधील सदस्यांनी नियमांचे पालन न केल्यास त्याला ग्रुपबाहेर
काढण्याचे हक्कदेखील ग्रुप संचालकाकडे असतात. परंतु, गृपबाहेर काढलेल्या सदस्याला परत ग्रुपमध्ये जोडण्यासाठी संचालकांच्या नावाने लिखित अर्ज करणे हा सोशल मीडियावरील प्रकार पहिल्यांदा टेकाडी येथे घडला. त्यामुळे आदर्शआचारसंहिता आणि ग्रुप नियमांचे काटेकोर पालन करण्याचा आदर्श ठरला आहे.
टेकाडी येथील कॅंप्युटर संचालक सचिन हूड यांनी गावातील विद्यार्थी, ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, बीडीओ, ग्रामविकास अधिकारी, क्षेत्रातील पत्रकार आणि इतर मान्यवरांसह गावातील हरहुन्नरी युवकांना जोडून "ई-स्कूल' नावाचा वॉट्‌सऍप ग्रुप सुरू केला. त्यात शासकीय माहिती, विद्यार्थी वर्गासाठी अभ्यासमाला, गावातील युवकांसाठी रोजगार माहिती, शासनाच्या नावीन्यपूर्ण योजना यांसारख्या विषयांचे आदानप्रदान मोठ्या संख्येने होत असते. अशात काही दिवसांपूर्वी ग्रुपमधील सदस्य अभिजित कुरडकर या युवकाने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना गावातील विकासकामांसंदर्भात धारेवर धरले होते. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ग्रुप संचालकांनी त्याला ग्रुपबाहेर काढले. परंतु, कुरडकर यांना ग्रुपबाहेर काढल्याचे पसंत न पडल्याने त्याने ग्रुप संचालकाकडे लिखित स्वरूपात अर्ज करत झालेल्या प्रकाराबाबत क्षमा मागितली. यानंतर ग्रुपवर आपत्तीजनक टिपणी करणार नसल्याची हमी लिखित स्वरूपात दिली. त्यांतर त्याला परत ग्रुपमध्ये जोडण्यात आल्याने सध्या ग्रुप संचालक आणि कुरडकर यांचे सर्वत्र कौतुक सुरू आहे. सोशल मीडियावरील हा प्रकार पाहिल्यादा घडल्याचे नाकारता येत नाही. भविष्यात अन्य ग्रुप संचालकांनीदेखील दखल घेऊन सोशल मीडियावर होणाऱ्या आपत्तिजनक टिपण्या थांबविता येत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

शासकीय योजनेचे आदान प्रदनासाठी हा ग्रुप बनविला होता. अपशब्दांचा वापर केल्याप्रकरणी सदस्याला ग्रुप बाहेर केले होते. सदस्याने स्वतः येऊन झालेल्या प्रकारणी माफी मागितली. परंतु, लिखित स्वरूपात दिल्यानंतरच त्यांना ग्रुपमध्ये परत जोडण्यात आले. अनुचित प्रकार व कुणाच्या भावना दुखावू नये हाच हेतू आहे. सोशल मीडियाचा गैरवापर थांबविण्याचा एक प्रयत्न आहे.
-सचिन हूड
वॉट्‌सऍप ग्रुपसंचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com