पीओपी मूर्तीवरून कुंभार समाज आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

यवतमाळ : पाणी प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेश मूर्तीवर प्रतिबंध आणावा, या मागणीसाठी महाराष्ट्र कुुंभार समाज महासंघाने गुरुवारी (ता.25) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

येत्या दोन सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येणार आहेत. "पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. सध्या जलपातळी खाली गेली आहे. अशास्थितीत विहीर किंवा नदी, तलावातील पाणी दूषित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट आणखीन तीव्र होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aquarius aggressor with POP idol