"पुरातत्त्व'चा खजिना वाचकांच्या भेटीला

"पुरातत्त्व'चा खजिना वाचकांच्या भेटीला

नागपूर : सागरतळाशी सापडलेली द्वारकानगरी, हंपी येथे झालेले उत्खनन या आणि अशा सर्व ऐतिहासिक वारसांची यथासांग माहिती व प्रत्यक्ष अथवा उपग्रहाद्वारे संकलित केलेल्या छात्राचित्रांचा लेखाजोखा असलेला "पुरातत्त्व' विभागाचा ग्रंथखजिना वाचकांसाठी खुला करण्यात आला आहे. या वाचनालयात इंग्रजी, हिंदी व मराठीसह विविध भाषेतील सुमारे अडीच हजार पुस्तके आहेत. शिवाय विभागाच्या वार्षिक अहवालाच्या खरेदीवर चाळीस टक्‍क्‍यांची सूट जाहीर करण्यात आली आहे. 
राजस्थान असो वा तमिळनाडू, आसाम असो वा कन्याकुमारी देशातील भारताच्या सर्वच राज्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने संशोधन व उत्खननाच्या मोहीम राबविलेल्या आहेत. गेली सत्तर वर्षे या संशोधनावर देशातील अनेक संशोधकांनी व लेखकांनी ग्रंथसंपदा शब्दांकित केली आहे. इतकेच नव्हे तर दिवाळी अंक, मासिक, साप्ताहिकाद्वारे अनेक जिज्ञासू लेखकांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यावर लेख लिहिले आहेत. या पुस्तकांचा व मासिकांचा मोठा संचय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या सेमीनरी हिल्स येथील कार्यालयात उपलब्ध आहे. मात्र, गेली काही वर्षे हा संचय व्यवस्थापनाच्या नाकर्ते स्वभावामुळे अडगळीत पडला होता. जो आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. 
पुरातत्त्व विभाग नेहमीच उत्खननाची माहिती जतन करून ठेवतो. हा वारसावस्तूंचा डेटाबेस असतो. ही संकलित माहिती दरवर्षी विभागाकडून प्रकाशित करण्यात येते. विशेष म्हणजे या अहवालांमध्ये पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने राबवलेल्या मोहिमा, परिचित तसेच अपरिचित वारसास्थळांची माहिती, तेथे जाण्याचे मार्ग यासह अनेक बाबी असतात. हे अहवाल पुरातत्त्व व इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्‍त ठरतात. तसेच ऐतिहासिक वास्तूंची माहिती गोळा करणाऱ्या संशोधकांना त्याचा मोठा फायदा होतो. या विभागात सुमारे 1952 साली प्रकाशित केलेल्या अहवालापासून ते अलीकडच्या संशोधनाचे अहवाल विक्रीसाठी खुले करण्यात आले असून, त्यावर चाळीस टक्‍क्‍यांची सूट मिळणार असल्याचे पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संचालकांनी सांगितले आहे. 
नागपूर विभागीय कार्यालयात विशाल ग्रंथसंपदा असल्याचे निदर्शनास आले. ही ग्रंथसंपदा अडगळीत पडली होती. त्याचा सर्वसामान्यांना फायदा होत नव्हता. आता हे वाचनालय खुले करण्यात आहे. शहरातील इतिहासप्रेमी नागरिकांनी वाचनालयास जरूर भेट द्यावी. 
- कोनुडुला रामकृष्ण रेड्डी, संचालक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com