गंभीर! चंद्रपूर जिल्ह्यातील विलगीकरण कक्षातील महिलेचा विनयभंग

vilagikaran.
vilagikaran.
Updated on: 

ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर) : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अनेकांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. मात्रर तिथे असलेल्या महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होण्यासारखी  घटना नुकतीच घडली.
 तालुका मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर असलेल्या नान्होरी जिल्हा परिषदेच्या शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये  असलेल्या युवतीचा गावातीलच एका इसमाने विनयभंग केल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दि. 25 मे रोजी दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून क्वारंटाईन व्यक्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे  क्वारंटाईन व्यक्ती कितपत सुरक्षित आहेत आणि प्रशासन त्यांची किती चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत हे या तक्रारीवरून समजून येते.
प्राप्त माहितीनुसार सदर युवती पुणे येथून आली असल्याने तिला गावातील शाळेत दि. 15 रोजी क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारीनुसार सदर युवती दि 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडे सात वाजता शाळेतील नळावर हात-पाय धूत असताना आरोपी काकाजी प्रधान याने शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आतमध्ये प्रवेश केला आणि हात पकडून अश्लील चाळे व शिविगाळ केली. यावेळी सदर युवतीच्या ओरडण्यामूळे  विलगीकरणात असलेल्या बहिणीने व इतर लोकांनी युवतीच्या दिशेने धाव घेऊन आरोपीला हटकले व ग्रामपंचायत चपराशी याने आरोपीला शाळेच्या बाहेर काढले त्यानंतर आरोपीने पळ काढला.

सविस्तर वाचा - वेळ रात्री अकराची...युवतीसोबत रस्त्यावर बोलत होता पोलिस कर्मचारी...मग काय झाले वाचा...
काही वेळाने सदर घटनेची माहिती चुलत भाऊ व सरपंच यांना मिळताच त्यांनी तत्काळ शाळेकडे धाव घेऊन घडलेल्या प्रकरणाची शहानिशा केली. ही मंडळी आरोपीच्या घराकडे गेले असता आरोपी काकाजी प्रधान याने चुलत भावाला ग्लासने मारहाण केली त्यामुळे चुलत भाऊ जखमी झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे याआधारे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात आरोपी काकाजी प्रधान यांच्याविरोधात कलम 294,323,354,506 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Open drains and stagnant wastewater raise sanitation concerns at Gadchiroli District General Hospital.
Gurudev Seva Mandal Clarification
Devotees gather at Gurukunj Mozari during the 58th death anniversary event of Rashtrasant Tukdoji Maharaj.
Sant Tukdoji Maharaj