लग्न करताय? यवतमाळकरांसाठी हा आहे स्पेशल "कोरोना पॅकेज' 

file photo
file photo

यवतमाळ : कोरोना संकटामुळे उद्योगधंदे, व्यवसायाची माती झाली. व्यवसाय करण्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेने अनेकांची झोप उडाली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शासकीय नियमांचे पालन करण्यासह काही बाबींना शिथिलता देण्यात आली आहे. ऐन लग्नसराइच्या हंगामात "लॉकडाउन'असलेली मंगल कार्यालयाचे कुलूप मे महिन्यात उघडण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग, नियमांचे पालन करण्याची हमी देत मंगल कार्यालयांनी आपल्या व्यवसायाचा "ट्रेंड' बदलला आहे. 

सोशल डिस्टन्सिंगचा वापर 
विवाह सोहळा म्हटले की, वधू-वर दोन्ही कुटुंबातील सदस्यांच्या उत्साहाला पारावार उरत नाही. कपडे, दागिने, कॅटर्स, फोटो, डेकोरेशन, पत्रिका, वाहन, मंगल कार्यालये, आदी बाबींची नातेवाइक, मित्र, मैत्रिणीला विचारून तयारी केली जाते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे विवाह सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. कोरोना लवकर जाईल म्हणून मुला-मुलींच्या आग्रहाखातर विवाह पुढे ढकलले. मात्र, कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे लॉकडाउन वाढत राहिला. अखेर सोशल डिस्टन्सिंग आणि मोजक्‍याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह आटोपता घेण्याला अनेक कुटुंबाने पसंती दिली. 

सोहळ्याला 50 नातेवाइकांची उपस्थिती 
आता विवाह सोहळ्याला 50 नातेवाइकांची उपस्थिती लावता येणार आहे. पावसाळा तोंडावर आल्याने घरी व्यवस्था करणे कठीण जाणार आहे. विवाह पुन्हा लांबणीवर टाकणे वधू-वर पित्याला परवडणारे नाही. त्यामुळे पावसाळा असला तरी विवाह सोहळे पार पडणार आहेत. हे ओळखून मंगल कार्यालय व्यावसायिकांनी 50 नातेवाइकांच्या उपस्थितीचा नवीन ट्रेंड आणला आहे. त्याला "कोरोना सुरक्षा पॅकेज' असे नाव देण्यात आले आहे. संपूर्ण व्यवस्था एकाच ठिकाणी होत असल्याने पालकही आता मंगल कार्यालयाकडे वळत आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यानिमित्ताने बाजारपेठेत उलाढाल वाढून व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. 

विवाह सोहळे थांबल्याने पालकांची अडचण होत होती. आमच्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. सोशल डिस्टन्सिंग राखत एक विवाह पार पडला. पालक तारीख व इतर बाबींची विचारपूस करीत आहेत. पाहुण्यांची नोंदणी, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग, मास्क वाटप यामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करावी लागली आहे. 
- संतोष राऊत,अमृत सेलिब्रेशन, यवतमाळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com