संत विचारातूनच सामाजिक सलोखा शक्‍य - रामदास आठवले

शंकर टेमघरे
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) - 'अहंकारामुळे भडकणारी मने संत विचारांच्या माध्यमातून शांत करण्याचे काम वारकरी संप्रदायातील प्रवचनकार, कीर्तनकारांनी करावे,'' असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे केले.

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) - 'अहंकारामुळे भडकणारी मने संत विचारांच्या माध्यमातून शांत करण्याचे काम वारकरी संप्रदायातील प्रवचनकार, कीर्तनकारांनी करावे,'' असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे केले.

अर्जुनी मोरगाव (येथे आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमलनाचे उद्‌घाटन रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, संमेलनाध्यक्ष रामकृष्ण महाराज लहवितकर आदी उपस्थित होते. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या वतीने जळगावकर यांनी लहवितकर यांच्या गळ्यात वीणा देऊन संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली.

आठवले म्हणाले, 'मराठा आणि दलित एकत्र आल्याशिवाय सामाजिक राजकीय दिशा मिळणार नाही. संत साहित्य संमेलनातील विचार हे समाज घडविण्याचे काम करीत आहेत.'' लहवितकर म्हणाले की, सामाजिक जीवनाला संत साहित्याच्या विचारांचे अधिष्ठान आवश्‍यक आहे. रडक्‍या अध्यात्माकडून समाजशुद्धीच्या उमद्या अध्यात्माकडे वळण्यासाठी समाजात संत साहित्याची अभिरुची निर्माण झाली पाहिजे.

ग्रंथदिंडीचे स्वागत
संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी अर्जुनी मोरगावातून ग्रंथदिडी काढण्यात आली होती. संत जीवनावर आधारित कलापथक तसेच आंबेडकर समता परिषदेचा रथ सहभागी झाला होता. रांगोळ्यांच्या पायघड्या घालून ग्रामस्थांनी ग्रंथदिंडीचे स्वागत केले.

संमेलनाची क्षणचित्रे
- पहिल्याच दिवशी मंडप भरगच्च
- आकर्षक व्यासपीठ, भव्य रांगोळी लक्षवेधी
- उद्‌घाटनाचा कार्यक्रम सत्कार समारंभामुळे रेंगाळला
- सर्व मंत्र्यांनी वाचला सरकारी कामाचा पाढा

Web Title: arjuni morgaon vidarbha news ramdas athawale sant sahitya sammelan