आर्णी तालुका जलमय ; 10 तासांत 121 मिमी पाऊस

सचिन शिंदे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

आर्णी : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यात एकूण 126 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी 16 अॉगस्टला सकाळी 7 ते सायंकाळी सहाच्या दरम्यान 121 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यातील अरूणावती, अडाण, पैनगंगा नदीसह लहान-मोठ्या नाल्यांना पूर आला. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. पांडुर्णा येथे 2 तर शिरपूर येथे एक असे तीन जनावर पुरात वाहून गेले. 45 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला.

आर्णी : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यात एकूण 126 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी 16 अॉगस्टला सकाळी 7 ते सायंकाळी सहाच्या दरम्यान 121 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यातील अरूणावती, अडाण, पैनगंगा नदीसह लहान-मोठ्या नाल्यांना पूर आला. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. पांडुर्णा येथे 2 तर शिरपूर येथे एक असे तीन जनावर पुरात वाहून गेले. 45 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला.

आर्णी शहर अरूणावती नदीच्या तिरावर असल्याने शहरातील ४०० घरामध्ये तसेच बाजारपेठेतील १०० दुकानामध्ये पाणी शिरले. शहरालगतच्या पुलावरूण पाणी वाहत असल्यामुळे सायंकाळी ६ ते रात्री २ वाजता पर्यंत वाहतुक बंद होती. त्यामुळे वाहतुकीमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. परंतु आर्णी शहरातील सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे चिराग शहा, अनवर पठाण, कादर ईसाणी, सैय्यद फैय्याज, अंकुश राजुरकर, निलंकुश चव्हाण, रमेश ठाकरे, निलेश गावंडे, नाना मारबते, रियाज बेग बाबा कंबलपोस दर्गा ट्रस्ट, हाजी अब्दुल करीम तैय्यब या प्रतिष्ठानने प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था केली. 

प्रशासकीय अधिकारी तहसीलदार भस्के, नायब तहसीलदार यू. डी. तुंडलवार, ठाणेदार यशवंत बाविस्कर, नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाने प्रवाशांना जेवणाची व निवासाची व्यवस्था करून दिली. तसेच अरूणावती नदीच्या तिरावरील लिंगी सायखेडा, भंडारी, आमणी, आसरा, शिवर भंडारी, विठोली या गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पैनगंगा नदी काठावरील साकुर, मुकिंदपुर, कवठा बाजार, राणी धानोरा, खंडाळा, उमरी कापेश्वर, वरूड तुका, कवठा बु.तसेच अडाणनदी च्या तिरावरील तरोडा, गणगाव, शेलु, ब्राह्मणवाडा, पहुर, पांगरी, म्हसोला, तळणी, कुऱ्हा,या गावातील शेतीचे नुकसान झाले. 

देवगाव प्रकल्प तुडुंब भरुन भिंतीवरून पाणी वाहत असल्याने त्यावरील नाल्याला पुर आला जवळा येथिल पुलावरून पाणी वाहत असल्याने यवतमाळ रोड तीन तास बंद राहीला. जवळा, खंडाळा, दाभडी या गावातील शेतीचे नुकसान झाले. अनेक मोठ्या नाल्यामुळे तालुक्यातील कोसदनी, अंबोडा, रुद्रापुर, कोपरा, चिखली, भंडारी, देऊरवाडी, सावळी सदोबा, या गावातील शेती पिकांसह खरडुन गेल्याने शेतकऱ्याची आर्थिक व वित्त हानी झाली आहे. 

सावळी सदोबा येथे 100 घरांमध्ये कोसदनीच्या झोपडपट्टी मध्ये ३० घरामध्ये चिखली, भंडारी गावात २०० घरामध्ये पाणी शिरल्याने घराची काही प्रमाणात पडझड झाली. चिखली येथिल दोनशे कुटुंबांना गावातील प्राथमीक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले होते. 

शहरातील तरूणाच्या मदतीमुळे पुरग्रस्थांची व प्रवासात अडकलेल्या प्रवाशांची गैरसोय टाळता आली. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था तहसील सभागृह, पंचायत समिती सभागृह तसेच बाबा कंबलपोस दर्गा येथे करण्यात आले होते. शहरातील नागरिकांच्या मदतीने सर्व शक्य झाले. तसेच शहरातील पुरग्रस्थांच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असुन १८ तारखेला ग्रामीण भागातील अहवाल तयार करण्यासाठी यंत्रणा जाणार असल्याचे तहसीलदार संदिप भस्के यांनी सांगितले.

Web Title: Arni Taluka Heavy Rain in 10 hours 121 MM rain