लाच मागणाऱ्या तलाठ्याला अटक

file photo
file photo

तिवसा (जि. अमरावती) ः शेती नावाने करण्यासाठी पैश्‍याची मागणी करणाऱ्या; परंतु सापळ्यात फसलेल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) वऱ्हा येथील तलाठ्याला मंगळवारी (ता. 11) दुपारी अटक केली. एसीबीचा हा सापळा एक महिन्यापूर्वी रचण्यात आला होता.
गोपाल श्रीराम लोणारे (वय 50) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
एका 43 वर्षीय तक्रारदाराच्या चुलत आजोबाच्या नावाने असलेली शेती तक्रादाराच्या वडिलांच्या नावाने करण्यासाठी तलाठ्याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यात तडजोड होऊन ती रक्कम 4 हजार रुपये निश्‍चित झाली. तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची 8 मे रोजी खातरजमा केली. खात्री पटताच 14 मे रोजी सापळा रचण्यात आला. मात्र सापळ्याविषयी शंका आल्याने तलाठी गोपाल लोणारे याने लाच स्वीकारण्याचे टाळले होते. मात्र एसीबीकडे असलेल्या पुराव्यामध्ये तलाठ्याने लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यावरून त्याच्याविरुद्ध मंगळवारी (ता. 11) अटकेची कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र जेधे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com