पोलिसांना गुंगारा देऊन पळालेल्या सिजोला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नागपूर : सुपर स्पेशालिटीमध्ये उपचार घेत असताना सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या कुख्यात आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याची पुन्हा त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. सिजो चंद्रन एल. आर. चंद्रन ऊर्फ नडार (38, रा. नवी दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिजो चंद्रनच्या विरोधात नागपूर शहरात अपहरण, चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. शहर पोलिसांनी त्याच्यावर मोक्काची कारवाई केली होती. याशिवाय त्याच्यावर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात गुन्हे दाखल आहेत. नागपूर येथे मोक्काच्या गुन्ह्यात त्याला मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहात असताना त्याची प्रकृती बिघडल्याने 4 जुलै रोजी त्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. त्याला वॉर्ड क्र. 43 येथे भरती करण्यात आले होते. त्याच्या देखरेखीसाठी पोलिस शिपाई राजेंद्र ठवरे आणि कमलेश टेकाडे यांची ड्यूटी होती. 20 जुलै रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास शौचालयात जातो असे सांगून तो बेपत्ता झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो शौचालयात मिळून आला नाही. त्यामुळे अजनी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. डीसीपी कार्यालयातील सायबर क्राइम पथकाने अहोरात्र मेहनत करीत सिजोचा पत्ता लावला, हे विशेष.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested shijo