'वंचित'च्या संसदीय समितीवर अशोक सोनोने यांची निवड

Ashok Sonone
Ashok Sonone

खामगाव : लोकसभा निवडणुकीत राजकीय धडकी भरविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल (ता.21) मुंबईत जाहीर केलेल्या त्रिसदस्यीय संसदीय समितीत भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांची निवड केली आहे. लक्ष्मण माने व अण्णाराव पाटील यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ‘वंचित'च्या भूमिकेकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. वंचित'चे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीची एकूणच रणनिती ठरविण्यासाठी विविध समित्यांची घोषणा केली.

सोनोने यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील भारिप बहुजन महासंघ व वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीची रणनिती ठरविण्यासाठी या समित्या महत्त्वपूर्ण असून त्यात महत्त्वाची भूमिका सोनोने निभावणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पुरोगामी लोकशाही आघाडीला फटका बसण्याइतपत मतदान मिळविले. जवळपास आघाडीच्या ११ जागांची बिघाडी वंचितमुळे झाली. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे ‘वंचित फॅक्टर'ची मोठी चर्चा राज्याच्या राजकारणात झाली.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढणार आहे. सक्षम लोकांना उमेदवारी दिली जाईल. सध्या आम्ही ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव हे आंदोलन सुरू केले आहे. मला संसदीय समितीत स्थान देऊन पक्षाने मोठी जबाबदारी व विश्वास टाकला आहे, तो मी सार्थ करून दाखवेल.
- अशोक सोनोने, प्रदेशाध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com