विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी आश्रमशाळेचा अधीक्षक निलंबीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

परतवाडा (जि. अमरावती) : अचलपूर तालुक्‍यातील पिंपळखुटा येथील दत्तप्रभू आश्रमशाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाला होता. याप्रकरणी अधीक्षकावर निलंबनाची कारवाई केली असून, मुख्याध्यापकाची वेतनवाढ रोखली आहे. बुधवारी (ता. सात) तसे आदेश जारी झाले.

आश्रमशाळा अधीक्षक सुनील इंगळे, प्रभारी मुख्याध्यापक संजय पोटे असे कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत. सातव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी (वय 13) काही दिवसांपासून सतत आजारी होता. धामणगाव (गढी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. मात्र, शनिवारी (ता. तीन) त्याची अचानक प्रकृती खालावली. त्याला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. त्याचा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शाळाप्रशासनावर रोष वाढत गेला. विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन सदस्यीय समितीची स्थापन करण्यात आली होती. चौकशी समितीच्या अहवालात शाळा प्रशासनावर ठपका ठेवण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षावर माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख यांनी संबंधित शाळेच्या प्रशासनाला जबाबदार धरत अधीक्षक, मुख्याध्यापकांवर ही कारवाई केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashram school superintendent suspended for student death