एएसआय राजेश मोरे यांची आत्महत्या 

ASI Rajesh More suicides
ASI Rajesh More suicides

जलालखेडा  - नरखेड येथे एक वर्षापूर्वी तर सध्या नागपूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात सहायक उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले राजेश मोरे (वय 52) यांनी नरखेड येथे भाड्याने राहत असलेल्या घरात काल (ता. 19 ) रात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण सध्या गुलदस्त्यात आहे. 

नरखेड येथे बरीच वर्षे सेवा दिल्यानंतर एएसआय राजेश मोरे यांची बदली नागपूर येथील ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात झाली होती. ते मागील तीन दिवसांपासून ड्यूटीवर गेले नसल्याची माहिती आहे. त्यांची पत्नी व दोन मुले हे दोन-तीन दिवसांपासून नागपूरला गेले असल्याने मोरे घरी एकटेच होते. त्यांनी आज रात्री आठ ते साडेआठ दरम्यान घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. नऊ वाजेदरम्यान त्यांचा मित्र त्यांना भेटण्यासाठी गेला असता त्याने आवाज दिल्यानंतर आतून काहीच आवाज न आल्याने त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना एएसआय मोरे हे पंख्याला लटकून दिसल्याचे दिसले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com