आसामच्या मुलीला पळवून लैंगिक अत्याचार

file photo
file photo


चंद्रपूर : शहरातील एका व्यक्तीने आसाम राज्यातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे फेसबूकच्या माध्यमातून फूस लावून अपहरण केले, तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या कारवाईने आरोपीवर गुन्हा दाखल करून मुलीला तिच्या पालकांच्या सुपूर्द करण्यात आले.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचा वापर करताना सामाजिक नीतिमूल्यांचे भान तसेच सतर्कता न बाळगल्याने अल्पवयीन बालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा अनेक घटना समाजात घडत आहेत. चंद्रपूर येथील एका इसमाने फेसबुकच्या माध्यमातून आसाममधील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केले होते. तसेच तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले. 18 सप्टेंबरला या मुलीच्या पालकांनी आसाममधील स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गतीने तपास करणे सुरू केल्यानंतर ती मुलगी चंद्रपूरमध्ये असल्याचे त्यांना कळले. 23 सप्टेंबर रोजी नागपूर येथील डीसीपीओमार्फत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना माहिती मिळाली. त्यानंतर लगेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी आर. एम. टेटे व जिल्हा परिविक्षा अधिकारी आर. एम. दडमल यांच्या मार्गदर्शनाखाली बाल पोलिस पथकाचे पोलिस निरीक्षक कोकाटे यांच्यामार्फत चौकशी केली. फेसबुकवरील मुलाचे फोटो व व्यक्तीची माहिती प्राप्त करून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करण्यात आला. तपासाअंती अपहरण करणाऱ्या इसमाचा आणि त्या मुलीचा शोध लागला. 24 सप्टेंबर 2019 रोजी मुलीचे समुपदेशन केले. त्याचदरम्यान तिचे लैंगिक शोषण झाल्याचे समजले. मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. 27 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हा बालकल्याण समितीच्या आदेशान्वये मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. फूस लावून अपहरण करून मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com