दीक्षाभूमीला एक कोटीची देणगी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नागपूर - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर 2000 साली दीक्षाभूमीला भेट दिली होती. सर्वधर्मसमभाव, मानवता, शांती, न्याय, समता, बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी त्यांनी पंतप्रधान निधीतून एक कोटीची मदत दिली होती. दीक्षाभूमीला सढळहस्ते मदत करणारे ते पहिले राजकीय व्यक्ती ठरले.

"सामाजिक न्याय के बिना स्वतंत्रता अधुरी हैं', ही त्यांची व्हिजिटर्स बुकमध्ये नोंदविलेली भावना बरीच बोलकी आहे. अटलजी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी 27 ऑगस्ट 2000 रोजी दीक्षाभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. या वेळी माजी राज्यपाल व स्मारक समितीचे अध्यक्ष स्व. रा. सु. गवई, सचिव सदानंद फुलझेले व अन्य सदस्य उपस्थित होते. स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी त्या आठवणींना उजाळा दिला. अटलजी व अडवाणी सुमारे अर्धा तास दीक्षाभूमीवर होते. संपूर्ण परिसराची पाहणी केली. दीक्षाभूमीचा विकास उत्तमोत्तम व वेगाने व्हावा, कीर्ती सर्वदूर पसरावी अशी मनीषा त्यांनी व्यक्त केली होती. दीक्षाभूमीच्या विकासासाठी त्यांनी एक कोटीचा निधी दिला. त्यातून अनेक कामे झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. दीक्षाभूमीच्या व्हिजिटर्स डायरीत एका वाक्‍यातच त्यांनी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताची संकल्पना मांडली होती. त्यांचे हे वाक्‍य सर्वांच्या मुखोद्गत आहे. 

Web Title: Atal Bihari Vajpayee One crore donation Deekshabhoomi