एटीएम फोडणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

तुमसर (जि. भंडारा) : गॅस कटरने एटीएम कापून 10 लाख 86 हजार 500 रुपयांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तीन आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपी जिल्ह्यातील खापा (तुमसर) व बेला (भंडारा) येथील असून तिसरा छिंदवाडा येथील रहिवासी आहे.

मध्य प्रदेशातील तिरोडी पोलिस ठाण्याअंतर्गत बोनकट्टा राज्यमार्गावर बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम 7 जुलैच्या मध्यरात्री या चोरट्यांनी गॅसकटरने फोडून रोकड लंपास केली. मध्य प्रदेश पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर होते. त्यांच्या शोधासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा, सिवनी, बैतुल, रायसेन व होशंगाबाद येथे पोलिस पथक रवाना झाले. आरोपींवर 25 हजारांचे बक्षीससुद्धा पोलिसांनी जाहीर केले होते.
सोमवारी मोवाड येथे प्रवासी प्रतीक्षालयात तीन संशयित युवक दुचाकीने आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी करताना त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपीत राजकुमार अंकुश हलमारे रा. खापा (ता. तुमसर), राहुल टोलीराम बोंदरे रा. बेला (ता. भंडारा), संत ऊर्फ संतोष सुखदयाल चौरे (रा. छिंदवाडा) याचा समावेश आहे.
लाखो रुपयांसह मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपीजवळून तीन लाख रुपये, एक पल्सर गाडी, गॅस कटर, काळा टेप, पाच मोबाईल, लॅपटॉप जप्त केले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी याच पद्धतीने जानेवारीत महिन्यात छिंदवाडा येथील हद्दीतून 6 लाख 55 हजार, नागपूर जिल्ह्यात वेलतूर येथे पाच लाख 86 हजार व कुही येथून 15 लाख 10 हजार 200 रुपये एटीएममधून लांबविले होते.

Web Title: ATM theft news