आत्महत्येची धमकी देऊन प्रेयसीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर : शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार केला. याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बजाजनगरात घडली.

नागपूर : शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार केला. याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बजाजनगरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन (बदललेले नाव, वय 17 वर्षे) महालमधील चिटणीसपुरा येथे राहतो. तर पीडित मुलगी स्नेहा (बदललेले नाव) ही अजनीत राहते. 2017 मध्ये तंत्रशिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली. दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. दरम्यान, रोहनचे स्नेहावर एकतर्फी प्रेम झाले. मात्र, त्याच्या प्रेमाला ती विरोध करीत होती. 18 जुलैला दुपारी रोहन तिच्या कॉलेजच्या समोर गेला. तेथून फोन करून तिला बाहेर बोलावले. तिला सोबत येण्यास बाध्य केले. दोघेही दुचाकीने त्याच्या महालमधील घरी आले. घरातील मंडळी गावाला गेल्याने घरी कुणीही नव्हते. दोघेही रात्री दहा वाजेपर्यंत थांबले. तिने घरी सोडून देण्यास सांगितले असता त्याने रात्रभर थांबण्यासाठी बळजबरी केली. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. तिने नकार दिला असतान त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे स्नेहाचा नाइलाज झाला. रोहनने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दुसरीकडे स्नेहाचे आईवडील तिचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी घरी आल्यानंतर कसून चौकशी केली असता स्नेहाने झालेला सर्व प्रकार आईला सांगितला. कुटुंबीयांनी विश्‍वासात घेऊन बजाजनगर पोलिसांत रोहनविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocities on the Girl by threatening suicide