पतीच्या सांगणावरून मित्राकडून पत्नीवर अत्याचार | Rape | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape
पतीच्या सांगणावरून मित्राकडून पत्नीवर अत्याचार

पतीच्या सांगणावरून मित्राकडून पत्नीवर अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ढाणकी (जि. यवतमाळ) - स्वत:च्या घरी पत्नीला बळजबरीने शारीरिक संबंधासाठी मित्राच्या हवाली करणार्‍या दारुड्या पतीला पोलिसांनी गजाआड केले.

महिलेच्या तक्रारीनुसार तिचा पती दारूडा आहे. घटनेच्या दिवशी तो त्याचा मित्र विशाल जाधव याला घेऊन घरी आला. दोघांनीही भरपूर मद्यपान केले. त्यानंतर झोपलेल्या पत्नीला मित्राच्या खोलीत मारहाण करून जबरीने लोटून बाहेरून दार बंद केले. यावेळी त्याच्या दारूडा मित्र विशाल जाधव (वय 35) याने महिलेवर अत्याचार केला.

हेही वाचा: भंडारा : मोटारसायकल नाल्यात पडल्याने दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

पीडितेने कसेबसे बिटरगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या गंभीर घटनेची त्वरित दखल घेत गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या व वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे साहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोस व पोलिस निरीक्षक कपिल मस्के यांचे दोन पथक तयार करून आरोपींच्या शोधार्थ रवाना केली.

या दोन पथकाने दोन तासांत आरोपीला अटक केली. आरोपींना अटक करणार्‍या पथकात पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पाटील, ठाणेदार प्रताप दत्तात्रेय भोसले, कपिल मस्के, रवी आडे, मोहन चाटे, सतीश चव्हाण, नीलेश भालेराव, स्वप्नील रायवाडे, गजानन खरात आदी पोलिसांचा समावेश होता. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

loading image
go to top